"कोई लौटा दे मेरे बिते हुए दिन*"
🍁मनातल्या मनातले 🍁
19Nov'2018
"कोई लौटा दे मेरे बिते हुए दिन*"
भूतकाळात गेलेले दिवस फिरुन यावेत याची आळवणी करणारी कितीतरी गाणी आहेत.
"बचपन के दिन,हाए रे वो दिन इ........ तुम्हालाही आठवायला लागली नं?
आयुष्याच्या मध्यावर आलं की सगळ्या आठवणी ताज्या व्हायला लागतात. मग मुलांसमोर आम्ही, आमच्या वेळी ....... असं म्हणत घरातल्या ,शाळेतल्या शिस्तीचे ,अभ्यासाचे धडे जास्त उगाळले जातात.
बाबा आदमच्या गोष्टींमध्ये मुलांना काही रस नसतो .ऐकतात ऐकतात आणि एक दिवस सुनावतात "सारखं काय तेच तेच,पुरे झालं. आता नाही तसं शक्य." आपण गप्प्! आपल्याही आयुष्यात बरचंकाही व्हायचं बाकी असल्याने पुढची वाटचाल सुरु होते . बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेत हळूहळू उताराकडे प्रवास सुरु होतो.
नातवंडांच्या आगमनाने नवीन उत्साह येतो. त्यांचं बोलणं चालणं लकबी यात आपल्या मुलांचं बालपण शोधायला लागतो. त्याचं बालपण उपभोगायला निवांतपणाच नव्हता मिळाला . "अगदी तुझ्या सारखा , तुमच्या सारखी हनुवटी वरची डिंपल इ ....."वक्तव्यांनी त्यांच्या आई बाबांचा चेहराही फुलून येतो .
आई बाबांच्या लहानपणच्या कथा बालमंडळी डोळे विस्फारुन ऐकतात मजा येते.
एकदा लहान मुलीकडे गेले तो ३ वर्षाचा नातू
"एक चिडिया अनेक चिडिया ,जंगल जंगल ,छिपकली के नानाsss हो या छिपकली के हो ससुर" या सारखी मुलींच्या लहानपणीची टि.व्ही वरच्याजाहिराती,सिरिअल्सची गाणी म्हणताना ऐकून मी थक्कच झाले. मुलीकडे बघितलं .तिला माझ्या नजरेतला आशय कळला. आईsssss म्हणत तिनी मला मिठी मारली. तिच्या डोक्यावरुन हात फिरवत म्हटलं
"असचं असतं . मुलांमध्ये आपलं बालपण शोधतो आपण "
त्या नंतर नातू तक्रार घेऊन घरी आला तर "माझा मुलगा असून रडत आलास मी तर.......अशा सारखे संवाद ऐकायला मिळू लागले.
वृध्दापकाळाकडे जसा माणूस झुकतो तसं
शरीर साथ देईनासं होतं,
स्मृती लपंडाव खेळायला लागते,
श्रुती आणि दृष्टी म्हणतात आम्हालाही निवृत्त कर आता.
माणसाच्या शरीराचा एक विलक्षण गुणधर्म म्हणजे एखादा अवयव, ज्ञानेंद्रिय काम करेनासं झालं की इतर इंद्रिय त्याची कसर भरुन काढतात. कान डोळे इ.. नी साथ सोडल्यावर घ्राणेंद्रिय,आणि रसना सतर्क होतात ,दुप्पट जोमानी काम करायला लागतात.
घरातलेच काय दूरवरचे खमंग सुवास घ्राणेंद्रिय बरोब्बर टिपतात,
रसना दोन्ही कामांसाठी (बोलणे आणि खाणे )ओव्हर टाईम करायला लागते. अशावेळी जर त्यांना ताब्यात ठेवलं नाही तर घरातले कर्ते ज्येष्ठांना सर्व कौटुंबिक समित्यांवरुन बरखास्त करुन त्यांची सल्लागार मंडळावर नेमणूक करतात." मग गेले ते दिन गेले "म्हणत सुस्कारे सोडत जुन्या आठवणींना जागवले जाते. आयुष्याचा लेखाजोखा मांडला जातो.
माणूस कितीही कर्तृत्ववान असला तरी झालेल्या चुका,अपयश आताची उपेक्षित अवस्था या बाबींचा सल यावेळी जास्त तीव्रपणे जाणवतो . बोचरा असतो. मग त्यावर मलमपट्टी करायला यशाच्या , सुखाच्या गाथा मनातल्या मनात आळवल्या जातात . कोणालातरी सांगाव्याशा वाटतात. बहुसंख्य काढता पाय घेतात . तरीही आमच्या सारखे श्रोते मिळतातच.
"बिकट परिस्थितीवर केलेली मात , मिळवलेले यश , दुर्गम भागात घोड्यावरुन जाऊन निभावलेली पोलिसी जीवनातली जबाबदारी " या सारख्या आपापल्या क्षेत्रातल्या सुरसकथा निरनिराळ्या ज्येष्ठांकडून सांगितल्या जातात. त्या शंभर वेळा जरी ऐकल्या असल्या तरी तरी आम्ही उभयता एकशे एकव्या वेळा तितक्याच भक्तीभावाने ऐकतो.
एक परिचित म्हणाले "तेच तेच सांगतात कंटाळा नाही येत का तुम्हाला ?"
" अहो त्यांच्या आयुष्यात आता नवे काय घडणार? कथा किर्तनातही तेच तेच असते मग ऐकतोच नां आपण? तसेच हे. ते आपल्या समाधानासाठी तसं हे त्यांच्या समाधानासाठी."
आपल्या यशोगाथा सांगतांना किती समाधान वाटते त्यांना. आयुष्याचा शेवटचा टप्पा " ego integrity vs despair" यांच्या संघर्षाचा काळ, जिंकू दे नं अहंकाराला ! ते समाधान घेऊन अंतिम चरणाची वाटचाल किती कृतार्थतेची असेल!
"शेवटचा दिस गोड व्हावा "या साठीच नां सगळा अट्टहास?
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@ सौ. अमृता खोलकुटे .

Comments
Post a Comment