पहाट पक्षी
🍁मनातल्या मनातले 🍁
14Nov'2108
पहाट पक्षी
दिवाळी संपली आणि पहाट पक्ष्यांची चहलपहल सुरु झाली. एका हातात पिशवी आणि दुस-या हातात वाकवलेली सळई,तार ,काठी इ.आयुधं घेऊन बारकाईने निरीक्षण करत चाललेली प्रत्येक गल्लीत दिसू लागली. दिवाळीच्या दिवसात दिसली नाहीत फारशी .
पूर्वी माझ्याच घरी चाफ्याचं झाड होतं .फुलं वेचायला यायची. मी पण आतल्या बाजूची फुलं कंपाऊंडच्या भिंतीवर ठेवायला लागले.
एक काका( चांगलेच म्हातारे) काठी घेऊन टाचा उंचावून झुकलेल्या फांदीवरची फुलं तोडायला धडपडायचे.भिंतीवरची फुलं नको असायची त्यांना. त्यांची आणि ह्यांची रोजची झमकाझमकी ठरलेली. सकाळी धुवायला गाडी बाहेर काढलेली आणि काका काठीनी झाड झोडपायचे. चाफ्याचा चीक गाडीवर पडला की निघता निघत नाही म्हणून यांची चिडचिड आणि पुन्हा कचरा काढावा लागेल म्हणून माझी नाराजी. या वर मी उपाय शोधला गच्चीवर जाऊन ताजी फुलं आणली काकांसमोर धरली. त्याच्याकडे साफ दुर्लक्ष करत काकांचा कार्यक्रम सुरुच . मी हतबुद्ध !काकांना तेच वर असलेलं "गुलबकावली"चं फूल हवं ,त्याला काय करणार? काही म्हटलं की तोंडाचं बोळकं दाखवत निर्व्याजपणे हसायचे. हे आणिच तणतणायचे. "एवढं बोलतो तरी काही वाटत नाही यांना .हसतात. " मी म्हटलं "ऐकायला येत नाही त्यांना. ओरडून काही उपयोग नाही. एकतर गाडी दुसरीकडे लावा नाहीतर खालच्या फांद्या छाटून टाका". या क्षेत्रातला माझा अधिकार मान्य करत जन्मात पहिल्यांदाच माझं म्हणणं मान्य केलं .फांद्या मात्र छाटल्या नाहीत.
एक दिवस काकांच्या हाती ३-४ फुलं आली मागून आवाज आला " आजोबा आजोबा मला द्या दोन फुलं " .बघितलं तो काय केसांचा शुभ्र कापूस झालेल्या , संधिवाताने चालणं कठीण झालेल्या काकू शक्य तितक्या झपाट्याने " डिगी डिगी बाला" करत येत होत्या. मी आश्चर्याने बघतच राहिले .या यांना आजोबा म्हणतात ? माझीपण हिंमत नव्हती झाली.
मला भिती वाटायची ती काका पडायची . तोल नाही सांभाळला गेला तर पडायचे. म्हातारपणी पडणं म्हणजे
" beginning of the end." ते माझ्या घरासमोर नको व्हायला. काही महिन्यांनी काका येईनासे झाले. आम्हा दोघांनाही चुटपुट लागली. ह्यांनी खाली झुकणा-या फांद्या तोडून टाकल्या.
एक काकू एक पाय (अगदी गेलेला) ओढत ओढत यायच्या. पण बाहेर आलेली फुलं नकोत यांना . भिंतीवरुन झुकून आतले गुलाब वगैरे तोडणार. झाडांमध्ये लपलेली जुईची वेल बरोब्बर दिसणार .त्या चार फुलांसाठी वीटेवर वीट,त्यावर चपटा दगड त्यावर उभं राहून चाललाय कार्यक्रम . मलाच राहवेना मी म्हटले "त्या चार फुलांसाठी दुसराही पाय जायबंदी करुन घ्यायचा आहे का? " त्यावर उत्तर "वासाची फुलं पाहिजेत ". कपाळावर हात मारायचीच वेळ.
आम्ही गावाहून आलो की एकतरी काठी,वाकवलेली तार ,सळाक झाडांमध्ये सापडते. आतली फुलं तोडतांना पडत असेल ,फाटकाला कुलूप .नंतर तरी मागणार कसं ? ४-५ जमल्या आहेत माझ्याकडे. 😄😄😄
पूर्वी तारेचं कंपाऊंड होतं .आतली फुलं दिसायची सगळ्यांना .हात घालून तोडता पण यायची 🤣🤣
एक ताई नवरात्रात बघत बघत जात होत्या . लाल, गुलाबी ,पांढ-या गुलाबांना खूप फुलं लागलेली. मी २ फुलं दिली त्यांना. देवीला जात होत्या. त्या तेलगू होत्या . दुसरी कोणतीच भाषा समजत नव्हती. मग रोजचाच परिपाठ झाला. देवळात जातांना २-४ फुलं घेऊन जाणार. नवमीला मोठ्या घरी कुळाचार आटपून घरी यायला उशीर झाला. थकलेही होते. फाटकाला ९-९.३०ला कुलूप लावले. थोड्या वेळानी फाटक जोरजाजोरानी वाजवल्याचा आवाज ,हाकाही यायला लागल्या. धडपडून सगळे बाहेर आलो. दिवा लावला तो तेलगू काकू आणि त्यांची सून दाराशी . काय झालं .?सून म्हणाली "किती समजावलं अंधार दिसतो झोपले असतील तरी हटून बसल्यात प्रसाद द्यायचा आहे तुम्हाला." त्यांच्या कडच्या २-३ प्रकारच्या पक्वान्नांनी भरलेला डबा घेऊन काकू हसतमुखानी बघत होत्या . गलबलून आलं मला . कोण मी यांची? असं काय मोठसं केलं? आठवणीनी प्रसाद घेऊन आल्या. आई नंतर दुस-या कोणी एवढी आठवण ठेवली नसेल. परमेश्वराचं रुपच म्हणायचं .
या पहाट पक्ष्यांना घरी झाडं लावा म्हटलं की फ्लॕट आहे,अंगण सिमेंटचं ,घर भाड्याचं अशी नाना कारणं सापडतात.
एक ओळखीच्या हक्कानी आत येऊन फुलं न्यायच्या. (मी समोर नसले तर कळ्याही. ) त्यांना म्हटलं एवढी जागा आहे तुमच्याकडे पावसाळ्यात खोचून द्या २-४ फांद्या . जास्वंदीच्या काढून देईन. त्या वर उसळून म्हणाल्या"कशाची लावते? लोकं तोडून नेतात. "मी आवाक्! म्हटलं " मग तुम्ही आता काय करताय?"
कसं असतं मानवी मन नाही? मी कोणाला काही देणार नाही . दुस-याचं ओरबाडायला तय्यार!
शेजारच्या वहिनी मी काॕलेजमध्ये गेल्यावर यायच्या . कुंदाला खूप बहर आलेला. अगदी पांढरी शुभ्र झालेली. झुबका पाचही बोटांनी ओढून तोडायचा, मुक्या कळ्याही तोडल्या जायच्या. पाळण्यावर ठेवून त्यातली फुलं वेचायची कळ्या तिथेच टाकून जायच्या.घरी आल्यावर त्या कळ्या बघून वाईट वाटायचं, मी त्या टोपलीत ठेवायची . काही दिवसांनी मला म्हणतात "वहिनी बार लवकर गेला कुंदाचा. " मी टोपलीतल्या कळ्या त्यांच्या समोर ठेवल्या "एवढ्या मुक्या कळ्या तोडून टाकल्या तर फुलं कुठून फुलतील ?बहर कसा राहिल? "
खरं आहे नां ? झाड असो वा घर मुक्या कळ्यांना फुलू दिलं नाही तर बहरेल कसं?
*सौ.अमृता खोलकुटे

Comments
Post a Comment