दिवाळी पहाट
🍁मनातल्या मनातले 🍁
6Nov'2018
दिवाळी पहाट ✨
आजकाल दिवाळीच्या दिवसांमध्ये ठिकठिकाणी "दिवाळी पहाट "चे आयोजन केले जाते. किती छान! ज्या कोणाला ही कल्पना सुचली त्याला लक्ष लक्ष धन्यवाद .
आजकाल पूर्वी सारखा सणाचा धडाका नाही ,फराळाची धांदल नाही सगळं कसं शांत . ज्येष्ठ नागरिकांपुढे तर काय करावं हा प्रश्नच उभा राहतो. त्यावर असे कार्यक्रम हे चांगले उपाय आहेत. मला खूप दिग्गज , मान्यवरांच्या कार्यक्रमांबद्दल नाही म्हणायचं. छोटे स्थानिक कलाकार ,मंडळं किती उत्साहाने कार्यक्रम करतात. घरोघरी पहाटे कार्यक्रमाला जायची लगबग सुरु होते. पहाटेच्या वेळी सुखद गारव्यात गीतांच्या सुरांनी वातावरण अगदी मंगलमय होऊन जातं .मन प्रसन्न होतं .
स्थानिक कलाकारांना किती वाव मिळतो. गायक,वादक,निवेदक. ज्याला ज्यात गोडी असेल ते क्षेत्र निवडावे.तरुण मुलांचा कल अशा क्षेत्रांकडे वाढतांना दिसतो. वेगवेगळ्या वाद्यांच्या सुरांनी मंत्रमुग्ध व्हायला होतं .खास करुन बासरीचे सूर मन मोहून टाकतात,तबल्याची थाप जोश निर्माण करते .त्यातून वादक जर जोमात आले तर जुगलबंदी अशी काही रंगते की टाळ्यांचा कडकडाट कितीतरी वेळ थांबत नाही. प्रत्येक कलाकाराला शाबासकीची थाप हवीच असते.
निवेदन तर फार सुरेख कला आहे.कार्यक्रमाला वेगळ्याच उंचीवर नेण्याचे सामर्थ्य निवेदनात असते.
मध्ये एका कार्यक्रमात निवेदिका सोशल मिडिया वरील वरील पोस्टस् घुसडत होती. छान रंगत असलेल्या गाण्यांमध्ये दाताखाली खडा लागल्या सारखं वाटायचं . नागपूरातल्या आता प्रतिथयश निवेदकांचे ते नवोदित असतानाचे निवेदन ऐकलेआहे .त्यातून त्यांचे परिश्रम,अभ्यास जाणवत होता. क्षेत्र कोणतेही असो कठोर परिश्रमा शिवाय यश नाही .
कार्यक्रम छान,संकल्पना छान पण उत्साहाच्या भरात भरकटत जाऊ नये. नाहीतर गणेशोत्सवासारखं व्हायचं . दिवाळी पहाट मध्ये" सैराट"ची गाणी. 😄
या भक्तीमय पहाटेचा आस्वाद घेतांना ज्याच्या स्वागतासाठी हा उत्सव साजरा करतो त्या श्रीरामाचे विस्मरण होऊ नये.
श्रीरामाचे चरण धरुन दुष्टांवर सुष्टांनी विजय मिळवण्याची परंपरा अशीच कायम राहू दे अशी प्रार्थना त्या रघुरायाला करुया. 🙏🏻🙏🏻
सौ. अमृता खोलकुटे .

Comments
Post a Comment