*उठा उठा दिवाळी आली.................
🍁मनातल्या मनातले 🍁
4Nov'2018
*उठा उठा दिवाळी आली.................
मित्र मैत्रिणींनो 🙏🏻🙏🏻
तुम्ही सगळे अगोदरच जागे झाले असाल पण माझी गत मात्र त्या विनोदातल्या देशस्थां सारखी झाली. 😂😂
परवा मुलीनी दिवाळीत नातू करणार असल्याच्या नाचाचा व्हिडिओ पाठवला आणि मी खडबडून जागी झाले .पदर बांधला आणि कामाला लागले . तुमच्या सर्वांकडे फराळाचे डबे भरुन झाले नं?
आपल्यापैकी पुष्कळांची मुलं जवळ नाहीत कामाच्या रगाड्यात त्यांना यायला सुट्याही मिळत नाहीत. म्हणून आता काय........ असं म्हणत कंटाळा करु नका आपल्या बालपणीच्या ,मुलांच्या बालपणीच्या दिवाळीची आठवण काढत दणक्यात साजरी करा दिवाळी.
आजकाल दिवाळी आली तरी पत्ता लागत नाही. लहानपणी दिवाळीची आतुरतेनी वाट बघायचो. फटाके,फराळ . चोरुन चकल्या खाल्ल्याची आठवण झाली की आजही लहान झाल्यासारखं वाटतं. "रम्य ते बालपण देई देवा फिरुनी" .
तुमच्याही मनात असेच विचार येतात नां?
दिवाळीच्या सुट्ट्यांमधला एक अंगावर काटा आणणारी गोष्ट म्हणजे दिवाळीचा दिलेला भला मोठा अभ्यास . सुट्टीत हुंदडतांना आई अभ्यासाची आठवण करुन अधून मधून मिठाचा खडा टाकायचीच मग थोडासा सोपा सोपा अभ्यास करुन पुन्हा बाहेर जायला तयार. राहून जायचा तो गणिताचा भला मोठा अभ्यास . सुट्टी संपली की त्याची आठवण यायची . मग काय शाळेच्या पहिल्या दिवशी हमखास पोट दुखायच. वहिनी गालातल्या गालात हसायची आणि दुपारी गणितं सोडवायला मदत पण करायची.
मी शिक्षण क्षेत्रात काम करायला लागले आणि माझ्या पुरता दिवाळीचा अभ्यास बंद करुन टाकला. खेळू द्या मुलांना सुट्टीत मग जुंपले जातातच घाण्याला.
नरकचतुर्दशीच्या पहाटे अभ्यंगस्नान करायचे. आई भल्या पहाटे उठून बंब पेटवायची. तिची औक्षवणाची लगबग आजही डोळ्यासमोर येते.😢😢
नरकात पडायच्या भितीने आंघोळीसाठी नंबर लावायला भांडणे व्हायची. नंतर गरमगरम चकल्यांचा फराळ आजही हवंहवसं वाटत.
लक्ष्मी पूजनाला सगळ्या दारांना तोरणं आणि फुलांच्या माळा लावायच्या . आमच्या घराला दारंही खूप . भाऊ तुझा हात पोहचणार नाही तू माळा कर, म्हणून किचकट काम माझ्या माथी मारायचे.
सिंदीच्या काटेरी फांद्यांना फुलं टोचून चौरंग सजवायचा आणि दणक्यात लक्ष्मी पूजन व्हायचं . दिव्यांच्या माळा लागायच्या पण पणत्या घरभर लागायच्या.
मी आजही घरभर पणत्या लावते. लहानशीच माळ,आकाशदिवा आणि घरभर पणत्या. गच्चीवरसुध्दा .मग बाहेर जाऊन घराकडे बघते. आजूबाजूच्या झगगमगाटा समोर पणत्यांनी उजळून गेलेलं माझं घरअगदी शांत ,सोज्वळ ,समाधानी दिसतं मला. म्हणून तर "परितोष" नाव दिलं घराला.
अंगणात सडा टाकून काढलेल्या रांगोळ्यांशिवाय दिवाळी पूर्णच होणार नाही. ठिपक्यांच्या रांगोळीचं आणि माझं काही विशेष जमलं नाही. २५-२५-३०-३० ठिपक्यांची रांगोळी काढणा-यांचं मला खूपच कौतुक वाटतं .
फटाक्यांची मजा तर औरच असते. मला आजही माफक प्रमाणात फटाके उडवायला आवडतात. मी उडवतेही. फटाके म्हणजे पैसा जाळणं,पणत्यात तेल वाया घालवणं बचतीची दिवाळी ,केवळ सोपस्कार इ.इ. लेखांकडे साफ दुर्लक्ष करते. आपल्या परंपरांचं जतन आपण नाहीतर कोण करणार? पुढल्या पिढीलाही त्या कशा समजणार ? माझ्या मुली नव्याचा हव्यास न धरता माझा वारसा पुढे चालवताहेत ययाचा अभिमान वाटतो मला.
या वेळेस जिकडे तिकडे प्रदर्शनं लागलेली असतात . दिवाळीची नेहमीची खरेदी मी इथूनच करते. आर्थिक स्वावलंबनातून आलेला त्यांच्या
चेह-यावरचा आत्मविश्वास मला सुखावून जातो. घराजवळ पणत्या घेऊन बसलेल्या आजीकडून पणत्या घेतांना "आत्ता सुपर मार्केटमध्ये आठवण केली होती. तिथे का घेतल्या नाहीस" आशा रागाने आलेल्या वक्तव्यांकडे साफ दुर्लक्ष करत आजीला पणत्यांचा भाव विचारते "शकुनाच्या तरी घ्या लागते"अशा तिच्या वक्तव्याला दुजोरा देते. बरोबरची कधी तिकडे स्वस्त आहेत याची जाणीव करुन देते.एवढ्यानी काय फरक पडतो मिळवू दे तिलाही दोन पैसे असं म्हणत खरेदी होते.
फुलवाल्यानी रांगोळी ,लक्ष्मीचा कागद, लाह्या बत्तासे असं काहीबाही लागणारं साहित्य ठेवलेलं असतं . माळा गुंफणारी किंवा पैशाचे हिशेब बघणारी त्याची चटपटीत बायको आणि उत्साहाने भाव सांगणारा ,आई बाबांना चुकले मम्मी पप्पांना मदत करणारा आठ दहा वर्षाचा मुलगा किंवा मुलगी. छान वाटतं बघायला. गि-हाईक आलं म्हणून मुलगा उत्साहानं पुढे येतो. "लागली कां रे शाळेला सुट्टी तुझ्या "अशा एखाद्या प्रश्नाने लाजून उत्तर देतो ते बघायला मला फार आवडते.
एखादी म्हणते मी तर अमुक अमुक संस्थेला दिवाळी निमित्त ,.......देते. ते सगळं ठीक आहे दिलंही पाहिजे पण अशा छोट्या दुकानदारांकडून घासाघीस न करता केलेली खरेदीने अनुदान थेट त्यांच्या खात्यात जमा झाल्याचं समाधान देतं .
🍁मनातल्या मनातले 🍁
खूपच लांबलं.
दिवाळी म्हणजे प्रकाशपर्व सगळ्यांच्याच आकाशदिवा आयुष्यात हे पर्व सुख , समाधान, समृद्धी आणि शांती घेऊन येवो हीच प्रार्थना .
"दिपावलीच्या शुभ पर्वात उजळावी मैत्रीची नाती.
लाभो तुम्हा सर्वांना आरोग्य, सुख आणि शांती. "
सौ. अमृता खोलकुटे

Comments
Post a Comment