संगीतातला देव हरपला
संगीतातला देव हरपला
बातमी ऐकली आणि काही सेकंद डोक्यातच शिरेना. सुप्रसिद्ध गीतकार,संगीतकार , गझलकार आणि गायक यशवंत देव नागपूर आकाशवाणी ला होते तेव्हाचेच माझ्या डोळ्यासमोर होते. त्यांची सदाबहार गाणी ऐकताना त्यांचे वय झाले असेल हे कधी मनातच नाही आले.
देवगाणी ऐकतच लहानाचे मोठे झालो. "भातुकलीच्या खेळामधली..... " या गाण्याचा अर्थ कळायचं वय नव्हतं तेव्हा पासून त्यांची गाणी म्हणत आलो.
किती म्हणून गीतं आठवावीत! "भावसरगम " हा कार्यक्रम कान देऊन ऐकायचो.
काॕलेजमधली एक मैत्रीण गाणंम्हणायला सांगितलं की " दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे." हे गाणेआर्ततेने म्हणायची .एक दिवस बसस्टाॕपवर तिचा मित्र आला तेव्हा हेच गाणे नेहमी का म्हणते याचे गूढ उकलले.
त्यांच्या एकेका गीताशी स्मृती निगडीत आहेत .
घरात लग्न ठरलं की"कोण येणार गं पाहुणे ",आणि लग्नात " जीवनात ही घडी " ही गाणी हमखास ठरलेली.
"नीज रे नीज बाळा " ने कितीतरी बालकांना जोजवले असेल.
यशवंत देवांच्या शब्दप्रधान गायकीमुळे सुरांबरोबर शब्दही हृदयाला स्पर्शून जात. "कुणी जाल का सांगाल का ,तू नजरेने हो म्हटले ,प्रिया आज माझी,स्वर आले दुरुनी ,अखेरचे येतील माझ्या " आशा कितीतरी गीतांनी गारुड केलं मनावर.
शेवटी " अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती " हेच खरं .
आजच्या काळात त्यांचे संगीत पुढल्या पिढी पर्यंत पोहचवून त्याच्या अवीट गोडीची ओळख करुन देणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल. त्यांना ,त्यांच्या संगीताला विनम्र अभिवादन. 🙏🏻🙏🏻
सौ. अमृता खोलकुटे

Comments
Post a Comment