प्रिय सौ.केतकी आणि अमित
22Oct2018
प्रिय सौ.केतकी आणि अमित "चपराक" मधील परदेशस्थ भारतीय मुलांचे मनोगत वाचले,तुम्ही तुमची बाजू मांडलीत .सोशल मिडियावरुन फिरणा-या पोस्टस् वरुन,सिरियल,सिनेमांमधून रंगवलेले परदेशस्थ स्वार्थी ,बेजबाबदार मुलांचे चित्रण बघून तुम्ही दुखावले जाणं स्वाभाविक आहे. आपले आई बाबा ही आपल्या बद्दल असाच विचार करतात अशी शंका तर तुमच्या मनात आली नाही नं ?आली असेल तर मनातून ताबडतोब काढून टाका. मुलांनो तुम्ही उच्च शिक्षणासाठी ,आपले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी परदेशात गेलात आम्हीही तुम्हाला प्रोत्साहन दिले. आम्ही मध्यमवर्गीय साधी माणसं .आमच्या काळात परदेशी जाण्याची स्वप्नं बघितली नाहीत म्हणा किंवा परिस्थितीने ती पूर्ण करता आली नाहीत म्हणा.आम्ही तुमच्या डोळ्यातून ती पूर्ण होताना बघितली मग तुम्हाला अडवायचं आमच्या मनात तरी कसं येणार ? . खरं सांगायचं तर नातेवाईकांमध्ये मान उंच केलीत तुम्ही. इथली परिस्थिती बघून तुमच्या आकांक्षांना मायेच्या पाशात बांधून न ठेवण्याचा निर्णय आम्हीच घेतला न ? लग्न झाल्यावर तू तिथे गेलीस .धडपड करुन आपलं स्थान निर्माण केलस. घर सोडून पहिल्यांदा बाहेर पडलीस ते ही एकदम परदेशात , त्यावेळची तुझी मनस्थिती मला नाही का समजणार ? तुमच्या वेदना आम्हीही जगलो. परददेशात नव्याने वावरताना असंख्य अडचणींना कसे तोंड दिले असेल या विचाराने आजही जीव कळवळतो. आम्हाला काळजी वाटेल म्हणून आमच्या पर्यंत काहीच पोहचू दिलं नाहीत याची जाणीव आहे आम्हाला. आणि आम्ही काही मदत करु शकलो नाहीत याची खंत ही. परदेशी गेलात पण तिथे काही तुमच्या साठी पायघड्या अंथरल्या नव्हत्या, धडपडत अडचणीतून मार्ग काढत सुखात असल्याचे दाखवत राहिलात. आज मिळालेल्या समृद्धी मागे तुमचे अपार कष्ट आहेत. अतिशय परिश्रमाने तुम्ही नंदनवन उभारलेत त्याची फळं चाखायचा अधिकारही तुम्हाला आहेच. विविध कारणांमुळे तिथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतलात आम्हीही तो मान्य केला. आमच्या काळजीने,आठवणीनी तुम्ही कासावीस होता हे माहिती आहे आम्हाला. तुम्ही इथल्या संस्कृतीत वाढलात. आजूबाजूच्या वातावरणाचे संस्कार झाले तुमच्यावर .त्या साठी फार काही वेगळे करावे नाही लागले पण आज आमचे नातू मराठी शाळेच्या हस्तलिखितात लिहितात ,आम्हाला, mother's day ला आईला मराठीतून पत्र लिहितात,face time वर शुद्ध मराठीतूनबोलतात,श्लोक म्हणतात ,आरतीत टाळ वाजवून ताल धरतात तेव्हा अभिमानाने ऊर भरुन येतो. सर्वस्वी वेगळ्या संस्कृतीत ही संस्कृती जपण,मराठीपण टिकवून ठेवणं सोपं नाही,घरात कटाक्षाने मराठी बोलता .श्रेयस म्हणायचा फक्त आजोबांना इंग्रजी येतं.सौरव तंबी द्यायचा "घरात मराठीच बोलायचं . "संस्कार याहून वेगळे काय असतात? हे शिवधनुष्य तुम्ही पेललत यासाठी शाबासकी द्यायची आहे. भारतातली मुलं सुद्धा इंग्रजाळलेलं मराठी बोलतात , सिनेमात दाखवतात तसं सण हे इव्हेंट म्हणून साजरे करतात . या पार्श्वभूमीवर तुम्ही जपलेली संस्कृती जास्त महत्वाची . नातेवाईकांची उणीव भासत असणारच, पण तुम्ही कितीतरी मित्र जोडलेत . अडचणीत साथ देणारे. बाबा तर नेहमी म्हणतात आपला शेजारी हा आपला सख्खा नातेवाईक . तुम्ही जपलेले संबंध बघून आमची काळजी काही अंशी कमी झाली. नातेवाईक तरी या पेक्षा वेगळं काय करतात?आपल्या व्यस्त दिनचर्येतून एकमेकांना मदत करायला धडपडता, तेच तुमचे आप्तेष्ट आहेत. आजकालच्या सोयींमुळे नेहमी बोलणं होतं ,एकमेकांना बघता येतं ,कधी आम्ही तर कधी तुम्ही येता, भेटी होतात, तिकडेच राहण्याचा निर्णय घेतला म्हणून खंत बाळगू नका, इथे आमचे व्याप असतात, आमचा छान वेळ जातो. लागलेली माणसं ही असतात मदतीला . तेव्हा आमची काळजी करु नका .निश्चिंतपणाने,आनंदात रहा मुलांकडे , संसाराकडे,करियरकडे लक्ष द्या. वयोमानानुसार पुढे घडणा-या गोष्टी अटळ आहेत, तुम्ही तडक याल याची खात्रीसुद्धा. त्याचा ताण घेऊ नये या गोष्टी कोणाच्याच हातात नसतात. तुम्हाला परदेशी पाठवले तेव्हाच मनाची तयारी केली. वरचेवर बोलणे होत असल्याने काही सांगायचे राहिले असंही काही नाही.आता तुम्ही मोकळ्या मनाने भरारी घ्या "घार उडते आकाशी लक्ष तिचे आईबाबांपाशी " तुझी सौ, आई,

Comments
Post a Comment