स्मशानाबाहेरील पाट्या आणि जीवनातला अर्थ
स्मशानाबाहेरील पाट्या आणि जीवनातला अर्थ
6Dec2018
आज एक पोस्ट वाचली. स्मशानाबाहेर लिहलेली पाटी. तेच नेहमीचं रिकाम्या हातानी आलास,कफनाला खिसे नाहीत मग आयुष्यभर खिसे भरण्यासाठी का धडपडलास? इ........
सगळं तत्वज्ञान सगळ्यांना माहित असतं तरी प्रत्येक जण पैसा मिळवायला धडपडतो. का? कारण आयुष्यात पैसा म्हणजे सर्व काही नसलं तरी जगायला पैसा लागतोच. त्याच्याशिवाय काय खरं आहे?
प्रयेक जण तर अंंगाला राख फासून हिमालयात नाही जाऊ शकत. तसं झालं तर हा संसार चालायचा कसा ?
साक्षात भगवान शंकरही हिमालयात विरक्त होऊन बसले की त्यांना संसाराच्या पाशात अडकवण्याचे प्रयत्न सुरु होतात. मग आपण तर सामान्य माणसं !
जगण्यासाठी पैसा लागतोच ! अन्न, वस्त्र , निवारा पैशांशिवाय मिळतो का?
शिक्षणासाठी तर पोत्यांनी पैसा ओतावा लागतो.
कलागुण जोपासायचे तरी दामाजीपंतां शिवाय काही खरं नाही.आजकाल टि.व्ही. वरच्या निरनिराळ्या कार्यक्रमातून गुणी व्यक्तींचा शोध घेतला जातो . त्याची केव्हढी प्रसिद्धी करावी लागते. सामान्यांच्या आवाक्या बाहेरचे आहे हे.
भर्तृहरिनी जरी
"सर्वे गुणाः काञ्चनम् आश्रयन्ते"
हे व्यंगात्मक अर्थाने म्हटले तरी आजही परिस्थिती तीच आहे. यावरुन लक्ष्मीची महती पटावी.
प्रत्येक गोष्टीसाठी पैसा हवा. वैद्यकीय उपचार तर आयुष्यभराची कमाई खाऊन टाकतात.
संतती असलेल्यांनाही मुलांच्या उपेक्षेला सामोरे जावे लागते मग अपत्यहीनांचं काय?
चार पैसे बाळगून असलेल्यांना "वर घेऊन जाणार कां" म्हणून हिणवले जाते पण त्यांची गत
" असेल मनी (money )तर पुसेल कुनी"
अशी असते.
कोणाचे किती श्वास बाकी आहेत हे कोणी सांगू शकत नाही. तेव्हा असलेला पैसा राखून ठेवणं आलंच.
मनुष्याला जीवनात काही करण्याची , कर्तृत्व दाखवण्याची महत्वाकांक्षा असते ती वाईट का आहे ?
अशा व्यक्तिंमुळे हजारोंना रोजगार मिळतो. वेगवेगळ्या क्षेत्रातील दैदिप्यमान यशामुळे संपत्ती बरोबरच नावलौकिकही मिळतो.
तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे आपलेही आयुष्य सुलभ आणि सुखकर होत असते नं ?
एकूणच जगण्यासाठी पैसा आवश्यकच आहे .
हां ...आता तो किती आणि कसा मिळवायचा हे ज्याच्या त्याच्या जीवन जगण्याच्या कल्पनेवर अवलंबून आहे.
मिळालेली संपत्ती सत्कारणी लावायला हवी हे मात्र खरं .
सेवाभावी संस्था अशा धनिकांच्या आश्रयाने चालतात.
वर उल्लेख केलेल्या पोस्ट वर नाना पाटेकरांचा फोटो आहे. त्यांचा या पोस्टशी किती संबंध आहे माहित नाही पण लोकं पैसे मिळवतात तेव्हाच " नाम फौंडेशनला" निधी मिळतो नं ?
चित्रपटसृष्टीत तर चित्रपटाने किती कोटी कमावले याचाच बोलबाला असतो.
मात्र पैशाची हाव नको. अगदी सात पिढ्या बसून खातील एवढ्याची अजिबात गरज नाही. अशाने पुढच्या पिढ्यांचे आयुष्यच बरबाद होते. त्यांच्यासाठी करण्यासारखे काही उरतच नाही. जन्माला येऊन त्यांनी करायचं काय ? मग अशा बाळांच्या गुण उधळण्याच्या निरनिराळ्या कथा कानावर येतात.
"सपूत हो तो धनसंचय क्यूँ?"
सुपुत्र आहे त्याच्यात धमक आहे कमवेल त्याचं तो . तुमच्या पैशांची गरज काय?
"कुपूत हो तो धनसंचय क्यूँ ?"
कुपुत्रासाठी कितीही धन ठेवा तो सगळ्याची विल्हेवाट लावणारच.
तेंव्हा सन्मार्गाने धन मिळवावे आणि सत्कारणी लावावे हेच खरे.
मनुष्य जरी रिकाम्या हाताने येत असला आणि रिकाम्या हाताने जात असला तरी आपल्या कर्तृत्वाने, दातृत्वाने, सलोख्याच्या सामाजिक संबंधाने इतिहासाच्या पानावर आपले नाव सोडून जातात .त्याची दखल घेणे क्रमप्राप्तच असते.
आपलेही या यादीत कुठेतरी कोपऱ्यात नाव असावे असा प्रयत्न करायला काय हरकत आहे ?
वर उल्लेख केलेल्या पोस्टपेक्षा फार पूर्वी एका cemetery बाहेरची
" तुमच्यासाठी शेवटची प्रार्थना करतांना आम्हालाच शरमिंदे व्हावे लागेल असे वागू नका. "
अशा काहीशा अर्थाची पाटी मला जास्त संयुक्तिक वाटते.
जो सन्मार्गाने आयुष्य जगतो त्याला कोणाच्याही नजरेला नजर देण्याची भिती वाटत नाही.
शेवटपर्यंत निर्भयपणे नजरेला नजर देण्याचे सामर्थ्य परमेश्वराने द्यावे हीच प्रार्थना
.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@ सौ. अमृता खोलकुटे

Comments
Post a Comment