अनुदिन अनुतापे ..........
अनुदिन अनुतापे ..........
25Feb'2019
दासनवमीच्या उत्सवात समर्थ रामदासस्वामींच्या दासबोध, मनाचेश्लोक इ .मधील मौलिक शिकवण ऐकायला मिळते. दरवेळी त्याचा नव्याने अर्थ उलगडत जातो.
रामदासस्वामींची विपुल ग्रंथसंपदा तर भारावून टाकणारी आहे. एका संन्याशाने प्रपंचातल्या किती बारीकसारीक गोष्टींचा विचार केला हे पाहून मन थक्क होते .
आध्यात्मिक क्षेत्रात मी शून्यच. ग्रंथांचे वाचन , किर्तन, प्रवचन यातला ऐकण्याचा अनुभवही नगण्यच. मात्र समर्थांची करुणाष्टके मला फार जवळची वाटतात. संसार तापाने होरपळलेल्या मनाने कळवळून रामाला केलेली विनवणी मनाला स्पर्शून जाते. आपल्या मनाचेही तेच भाव नसतात का?
सामान्य माणसं आपण! प्रपंचाच्या
भोव-यात अडकलेली!
"जिंदगी हर कदम एक नयी जंग है"
याचा अनुभव घेणारी. प्रपंचाचा अर्थच मुळात माया, झंझट, बखेडा. तो सरळ साधा तरी कसा असणार? रोजच्या रोज नव्या समस्यांना सामोरे जातांना सहनशक्तिचा अंत पाहिला जातो. कुठवर टिकाव धरणार?
कधीकधी मन अगदी व्याकुळ होऊन जातं. माणसांच्या गराड्यात असूनही अगदी एकटं, " समुद्री चहूकडे पाणी पिण्याला थेंबही नाही" अशी अवस्था. मनातलं सांगायचं तरी कोणाला? एकच जागा असते ती म्हणजे आई. सगळं शांतपणे पोटात ठेवणारी पाठी वरुन मायेचा हात फिरवणारी, दिलासा देणारी. तीच नसेल तर जायचं तरी कोणापाशी? गणगोत सगळं माया आणि वैभवाने बांधलेले . वैभव म्हणजे नुसती संपत्ती नव्हेच . पद, प्रतिष्ठा, रुप, गुण एखादी कला ,तारुण्यातली ability to perform , म्हणजेही वैभवच की. पण त्याचे कौतुक वाटण्या ऐवजी ईर्षा वाटणारेच जास्त. पावलोपावली येणाऱ्या अनुभवांनी मन उद्विग्न व्हायचं.
अशा परिस्थितीत आप्तजन तुमच्या हाकेला कशाला धावतील? आणि धावले तरी वात्सल्याचा भाव त्यांच्या मनात कितपत असणार? लहानपणी खेळत असलेल्या "कानगोष्टी" च्या खेळासारखी गत व्हायची आपल्या व्यथेची.
अशा व्याकुळ अवस्थेत तोंडातून आपसुक शब्द बाहेर पडायचे
" अनुदिन अनुतापे
तापलो रामराया "
त्या रामरायाशिवाय मनाच्या व्यथा सांगणार तरी कोणाला?
अपमान, अवहेलना, उपेक्षा,हताशा, निराशा, संताप, भय, अशा सगळ्या भावनांचा संमिश्र कल्लोळ शांत करण्यासाठी करुणाष्टकांचा आसरा दिलासा देणारा असायचा, करुणाष्टके म्हणतांना मनातल्या सगळ्या व्यथा मांडल्या जायच्या मन हलकं व्हायचं डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागायचे. आर्त मनाने रामाला साद घालून सगळा भार त्याच्यावर सोपवला की शांत वाटायचं . समोरचा मार्ग दिसायचा.
त्यावेळी " रघुनायका मागणे हेचि आता " यावर जास्त भर असायचा आणि आता रोज " कृपा कटाक्षे सांभाळि दीना तुजवीण रामा मज कंठवेना " चा आठव येतो.
दासबोध म्हणजे परीसच ज्याच्या हाती लागला त्याच्या आयुष्याचे सोनेच होणार ! मला मात्र करुणाष्टकेच आवडतात.कळवळून रामाला साद घालणारी ,
आपले गा-हाणे मांडणारी.
आज संसाराच अवलोकन करतांना करुणाष्टकांनी मनाला किती आधार दिला हे जाणवतं . परमेश्वरानेही हाकेला धावून प्रपंचाची नाव इथवर सुखरुप आणली आहे, प्रत्यक्ष रामरायाच नावाडी असतांना चिंता तरी कशाची करायची?
"आम्हा अनाथासी तू एक दाता
संसार चिंता चुकवी समर्था
दासा मनी आठव वीसरेना
तुजवीण रामा मज कंठवेना ll
जय जय रघुवीर समर्थ
🙏🏻🙏🏻
@ सौ.अमृता खोलकुटे .

Comments
Post a Comment