नव संवत्सर 🙏🏻🙏🏻
नव संवत्सर 🙏🏻🙏🏻
5Apr2019
चैत्र शुद्ध प्रतिपदा नवीन वर्षाचा पहिला दिवस. इंग्रजी महिन्याप्रमाणे व्यवहार करतांना गुढीपाडव्याचा विसर तर नाही नं पडला ?
विक्रम संवत् ही खगोल शास्त्रीय सिद्धांतावार आधारित कालगणनेची पद्धती. आपल्या संस्कृतीत चैत्र शुद्ध प्रतिपदेचे महत्व वेगवेगळ्या प्रकारे स्पष्ट होते.
ब्रम्हदेवाने याच दिवशी सृष्टीच्या रचनेला प्रारंभ केला आणि सत्ययुगाची सुरुवात झाली.
शालिवाहनाने मातीच्या पुतळ्यांमधे प्राण फुंकून युद्ध जिंकले. म्हणून या कालगणनेला शालिवाहन शक म्हटले जाते.
आजकालची पिढी तर अशा कथांना थाराही देणार नाही. या कथांचा शब्दशः अर्थ न घेता या कडे जरा निराळ्या दृष्टीने बघायला काय हरकत आहे? कदाचित त्यावेळी समाजात वारंवार होणा-या आक्रमणांनी आणि पराभवाने उदासीनता , हताशा , निर्बलता आली असावी. असा मृतवत् झालेला समाज म्हणजे मृत्तिकावत् समजला गेला. त्यात शालिवाहनाने स्फूर्ती आणली, चैतन्य निर्माण केले आणि परिणामी युद्ध जिंकले असावे.
नवीन पिढीला अशा त-हेने आपल्या संस्कृतीच्या कथांचा आशय सांगण्याची गरज आहे.
शिव पार्वतीचा विवाह सुद्धा याच दिवशी झाला. या दिवसापासून पार्वतीच्या शक्ती रुपाची पूजा केली जाते. चैत्र महिनाभर गौरी माहेरी असते म्हणून तर चैत्रात हळदीकुंकवाचे समारंभ थाटात व्हायचे. नंतर अक्षय तृतीयेला गौरी सासरी जाते. किती सुंदर कल्पना आहे नाही ?
आपल्या संस्कृतीत स्त्री शक्तीला नेहमीच गौरवले आहे.
श्रीरामाने लंकाधिपती रावणाचा पराभव केला .चौदा वर्षांचा वनवास भोगून याच दिवशी अयोध्येला परत आले म्हणून गुढ्या उभारुन स्वागत करण्याचा रिवाज आहे. रामनामाने वातावरण भक्तीमय होऊन जाते.
वेदांग ज्योतिष्यातल्या साडेतीन मुहूर्तां पैकी गुढीपाडवा एक. नव उपक्रमाची सुरुवात करण्यासाठी शुभ दिवस.
गुढी म्हणजे तरी आहे काय? रेशमी वस्त्र , कलश, कडुलिंबाची, आंब्याची पाने , गाठी , हार प्रत्येकाला अर्थ असतो तो आपण लावलेला. या एकत्रित जिन्नसांना मिळून उभारलेल्या गुढीला देवत्व प्राप्त होते आणि श्रद्धेने मनुष्य आपोआप नतमस्तक होतो .
उंच उभारलेली गुढी म्हणजे आपल्या उत्तुंग महत्वाकांक्षेचे प्रतीकच नाही का ? गुढी म्हणजे विजय आणि समृद्धी चे प्रतीक!
वातावरणही किती प्रसन्न असते. शिशिरातील पानगळ संपून वसंताचे आगमन होते चैत्र पालवी फुलू लागते. दोन ऋतुंचा संधीकाल.
गीतेत विभूतीयोगाच्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण म्हणतात
" पृथ्वीवरचा कुसुमाकर म्हणजे वसंतऋतू तो मीच"
वसंत ऋतुला कुसुमाकर असेही म्हणतात. या ऋतुत सगळीकडे फुले फुललेली असतात म्हणून की काय ?
पळस, बहावा , करंज , शिरीष बहरतात, गुलमोहर फुलायला लागतो, आणि कितीतरी चित्तवेधक रंगांनी फुललेले वृक्ष मन मोहून टाकतात.
शेतातल्या पिकांचा पिवळसर रंग आणि सरसूच्या फुलांचा गालिचा सृष्टीला वेगळेच सौंदर्य प्राप्त करुन देतो. वातावरण सुगंधी होते.
अधून मधून कोकीळेची तान ऐकू यायला लागते.
मला अभ्यासाला असलेल्या Spring Morning ( बहुतेक R .L.Stevenson ची) या कवितेची नेहमी आठवण होते. सकाळचे कोवळे ऊन, फुलणारी फुलं, लार्क पक्ष्याचे कूजन याचे वर्णन होते त्यात . मला खूप आश्चर्य वाटायचे एवढं आवर्जून कविता करण्या सारखं काय आहे ? spring चं एवढं काय कौतुक करायचं ?
किती मजा आहे नाही ? आपल्याला जे सहज प्राप्त होतं त्याची आपल्याला किंमत नसते.
याचा अनुभव मला मुलीकडे न्यू जर्सीला गेल्यावर आला. सुरुवातीला snow fall चं कौतुक वाटायचं पण...........
नंतर जेव्हा आतुरतेने spring कधी येणार याचा अंदाज घ्यायला लागलो तेव्हा कवितेचा अर्थ ताबडतोब कळला !
वसंतोत्सवाच्या पहिल्या दिवसाच्या , नव वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्ष सगळ्यांना सुख, समृद्धीचे जावो. आयु - आरोग्य लाभो हीच ईश चरणी प्रार्थना.
आणि हो सृष्टीच्या रचनेचा पहिला दिवस ! सत्ययुगाची सुरुवात ! नव्या संवत्सरातही सत्ययुग अवतरेल अशी कामना करायला काय हरकत आहे ? न जाणो त्याच वेळी परमेश्वर तथास्तु म्हणायचा !
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
© सौ.अमृता खोलकुटे

Comments
Post a Comment